नवी दिल्ली :  Shaktikanta Das on Debt recovery : वसुली एजंटांना RBIने मोठा दणका दिला आहे. वसुली एजंटांची गुंडगिरी थांबविणार, असे RBIने स्पष्ट केले आहे. यापुढे गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लोक होम लोन किंवा वैयक्तिक कर्ज घेतात. मात्र, बराचवेळा बँकांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येतो. यासाठी काही बँका एजंटची मदत घेतात.त्यांच्यामाध्यमातून मोठा दबाव आणला जातो. आता एजंटकडून कर्जदारांवर गुंडगिरी आणि अर्वाच्य भाषा वापरल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत.


कर्ज वसुली प्रकरण लवकर संपणार आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. यापुढे जे चूक करतील त्या संस्थांविरुद्ध गंभीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. दास पुढे म्हणाले की, काही सावकारांकडून वापरल्या जाणार्‍या कठोर वसुलीच्या पद्धती ही मध्यवर्ती बँकेसाठी चिंतेची गंभीर बाब आहे. 


वसुली एजंट ग्राहकांशी निर्दयीपणे वागतात, अवेळी कॉलकरुन अपशष्दांचा वापर करतात. मात्र हे आता मान्य होणार नाही. आता यापुढे असे काही प्रकरण समोर आल्यास कारवाई केली जाईल, असं दास शिखर परिषदेत बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या एजंटला आरबीआयने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.