परवाना काढतानाच करू शकाल अवयव दानाची इच्छा व्यक्त
अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी आता परिवहन विभागानं एक पाऊल पुढे टाकलंय.
मुंबई : अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी आता परिवहन विभागानं एक पाऊल पुढे टाकलंय.
आता, वाहनचालक परवाना बनवतानाच अवयव दानासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांकडून एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे. इतकंच नाही तर या नागरिकाच्या परवान्यावरही 'मी अवयवदाता आहे' असा उल्लेख असेल. त्यामुळे, एखादी दुर्घटना झाली तरी वेळेतच त्याचे अवयव दान केले जाऊ शकतील... आणि त्याचा फायदा इतर गरजू नागरिकांना मिळू शकेल.
इच्छेनुसारच अवयव दान
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं परवान्याच्या फॉर्मसाठी नवी व्यवस्था लागू करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जाहीर केलं होतं. यानुसार, नागरिकांकडून परवाना काढतानाच त्यांच्या इच्छेनुसार घोषणा पत्र भरून घेतलं जाणार आहे. ज्या नागरिकांना अवयवदानाची इच्छा नसेल त्यांच्यासाठी 'नाही' हा पर्याय खुला राहील.