मुंबई : कोणत्याही कुटुंबातील मुलीनं अगदी चांगला वर शोधूनच संसार थाटावा असंच प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. ही अपेक्षा पूर्ण झाली आणि मुलीला तिच्या सासरी सुखानं नांदताना पाहिल्यावरच त्यांच्या मनात एक सुखद भावना घर करुन जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील अर्थात अंबानी कुटुंबातील वरिष्ठांचीही हीच प्रतिक्रिया. 


मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या-न त्या कारणानं प्रसिद्धीझोतात असतो. लहानसहान कारण का असेना, या मंडळींबाबत चर्चा कायमच होत असते. 


अशा या कुटुंबात काही व्यक्ती मात्र प्रसिद्धीपासून बऱ्यापैकी दूर असतात. यामध्ये अंबानींच्या बहिणी नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर यांचा समावेश आहे. 


जिथं मुकेश आणि नीता अंबानी यांचं लग्न 'arranged' पद्धतीनं करण्यात आलं होतं. तिथेच दिप्ती, या त्यांच्या बहिणीनं मात्र तिचा जोडीदार स्वत:च निवडला होता.


कुटुंबीयांच्या सहमतीनंच हे लग्न झालं होतं. 


एकाच इमारतीत राहत होता मुकेश अंबानींच्या बहिणीचा प्रियकर... 
सूत्रांच्या माहितीनुसार 1978 मध्ये धीरुभाई अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईतील उषा किरण अपार्टमेंट या इमारतीत 14 मजल्यावर वास्तव्यास आलं. 


तत्कालीन प्रसिद्ध व्यापारी वासुदेव साळगावकर हेसुद्धा त्याच इमारतीत 22 व्या मजल्यावर आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. 


साळगावकर आणि अंबानी कुटुंबीयांमध्ये घरचे संबंध होते. 


वडिलांच्या मैत्रीमुळे मुकेश अंबानी आणि दत्तराज साळगावकर हेसुद्धा एकमेकांचे मित्र झाले. 


ओघाओघानं दिप्ती आणि दत्तराज यांच्यातील जवळीक वाढत गेली. जवळपास 5 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी कुटुंबाला यात सहभागी करुन घेतलं. 


दोघांच्याही कुटुंबीयांनीहसतमुखानं हे नातं स्वीकारलं आणि 1983 मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली. 


सध्या दिप्ती एक गृहिणी आहेत. त्या पतीसोबत गोव्यात स्थायिक झाल्या आहेत. दत्तराज आणि दिप्ती यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्यं आहेत. 


मुकेश आणि अनिल या दोन्ही भावांची दिप्ती लाडकी बहिण असल्याचंही म्हटलं जातं. या दोघांमधील वाद मिटवण्यातही त्यांचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं जातं.