अणुबॉम्बवरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
आज पोखरण येथे पोहोचले होते राजनाथ सिंह
नवी दिल्ली : अण्वस्त्राचा आपणहून पहिले वापर करणार नसल्याच्या तत्वाशी भारत आतापर्यंत कटिबद्ध राहिला आहे. मात्र भविष्यात परिस्थिती पाहून याबाबतचा विचार केला जाईल असं मोठं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं राजनाथ सिंहांनी पोखरणला जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला.
जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद-370 हटवल्यानंतर पाकिस्तानने कुरापती सुरु केल्या आहेत. या विरोधात तो जगभरात आपलं समर्थन करण्याची मागणी पाकिस्तान करतो आहे. पण चीन शिवाय कोणताच मोठा पाकिस्तान सोबत उभा नाही. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये आज पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, 'आज आमची न्यूक्लियर पॉलिसी 'No First Use', आहे. पण पुढे काय होईल ती येणारी परिस्थिती सांगेल.'
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने मे 1998 मध्ये पोखरण येथे अणुचाचणी केलं होतं. यानंतर संपूर्ण जगाने भारताची ताकद पाहिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणी करण्यासाठी दिलेल्या परवानगीनंतर देशभरात त्यांच्या या निर्णयाचं स्वागत झालं होतं.