नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून आज निर्मला सीतारमण यांनी पदभार स्वीकारला आहे. पदाची धुरा हाती घेण्याआधी सीतारमण यांनी पुरोहितांच्या उपस्थितीत कार्यालयात मंत्रोच्चार आणि आशीर्वाद घेतला. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह संरक्षण खात्याचे अनेक अधिकारी  उपस्थित होते. देशाची लष्करी ताकद मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात सीतारमण यांना बढती मिळाली होती. सीतारमण यांना हे पद मिळाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण पंतप्रधान मोदी कधी कोणावर विश्वास दाखवतील आणि त्यांना संधी देतील हे कोणीच सांगू शकत नाही. यासोबतच सीतारमण या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री झाल्या आहेत. ऐवढ्या मोठ्या पदावर एका महिलेची निवड होणं  ही खूपच वेगळी गोष्ट आहे. सीतारमण यांची जबाबदारी आता वाढली आहे.


मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात मुख्यमंत्री म्हणून गेल्याने हे खातं अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आलं होतं पण ऐवढं मोठं खातं सांभाळण्यासाठी एक वेगळा आणि सक्षम नेता हवा. त्यामुळे मोदींच्या मंत्रीमंडळात हे पद कोणाला मिळणार याबाबत देखील मोठी उत्सूकता होती. पण ही जबाबदारी आता सीतारमण या सांभाळणार आहेत.