दिल्लीच्या पश्चिमपुरीत भीषण आग, 250 झोपड्या जळून खाक
राजधानी दिल्लमीध्ये मागच्या 24 तासात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लमीध्ये मागच्या 24 तासात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. दुसरी घटनाही तितकीच गंभीर आहे. बुधवारी पश्चिमुपी विभागात एका झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये साधारण 250 झोपड्या जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी 20 गाड्या पोहोचल्या आहेत. यावरून आगीची दाहकता लक्षात येऊ शकते.
न्यूज एजंसी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री 1.15 च्या सुमारास आग लागली होती.
आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल माहिती समोर आली नाही. कोणत्याही प्रकारच्या जिवीतहानीचे वृत्तही समोर आले नाही. आगीनंतर झोपडपट्टी विभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अग्नीशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. 28 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण काही कारणांमुळे गाड्यांना बाहेरच थांबावे लागले. त्यामुळे आग विझण्यास तासभराचा वेळ लागला. पोलिसांनी घटनास्थळाहून छोटेछोटे सहा अवैध सिलेंडर जप्त केले.