आताची मोठी बातमी! दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरु
दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी 11.54 च्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi AIIMS FIRE: दिल्लीच्या AIIMS रुग्णलातील एन्डोस्कोपी कक्षात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून बचावकार्य (Resque Operation) सुरु करण्यात आलं आहे. सकाळी 11.54 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर तात्काळ सर्व रुग्णांना इमर्जन्सी वॉर्डमधून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील एंडोस्कोपी कक्षाला आग लागली. सुदैवाने सर्व रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठी जीवतहानी टळली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीने काही क्षणातच भीषण रुप घेतलं. आगीचे लोट दूरवरुन दिसून येत होते.
याआधी जून 2021 मध्ये एम्स रुग्णालयात आग लागल्याने खळबळ उडाली होती. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या गेट क्रमांक 2 जवळील कन्व्हर्जन ब्लॉकच्या नवव्या मजल्यावर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या 26 हून अधिक वाहानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत कोरोना लॅबमध्ये ठेवलेले सर्व सॅम्पल जळून राख झाले.
दिल्लीच्या AIIMS रुग्णालायत देशातील नाही तर जगभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. एका रिपोर्टनुसार एम्समध्ये दररोज सुमारे 12 हजार लोकं तपासणीसाठी येतात.
एम्समध्ये सध्या विकामाची कामं सुरु आहे. पुनर्विकास योजनेअंतर्गत एम्समध्ये 50 नवीन ऑपरेशन थिएटर्स बांधण्यात येणार आहेत. यासोबतच 300 इमर्जन्सी बेड्ससह 3,000 हून अधिक अतिरिक्त पेशंट केअर बेड्सही (Patient Care Beds) तयार करण्यात येणार आहेत. एम्सच्या मास्टर प्लानला तात्काळ मंजूरी द्यावी असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुचवलं आहे. जेणेकरुन मार्च 2024 पर्यंत एम्समध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील याचा उपयोग अधिकाधिक रुग्णांना होऊ शकतो.
एम्सचं सर्व्हर हॅक
याआधी एक विचित्र घटना घडली होदी. सायबर गुन्हेगारांनी एम्सचं सर्व्हर हॅक केलं होतं. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. हॅकर्सने 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम क्रिप्टो करन्सीच्या रुपात मागण्याती आली होती. दिल्ली पोलिसांनी हॅकर्सना खंडणी देण्यास नकार दिला होता.