नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. केद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांची जुगलबंदी प्रचारादरम्यान पाहायला मिळली. शाहीन बागसह अनेक मुद्द्यांवर अमित शाह यांनी केजरीवालांवर आरोप केला. तर शाहांच्या या आरोपांना केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर दिलं. अमित शाह यांनी दिल्लीच्या जनतेचा अपमान करणं बंद करावं असं केजरीवालांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएएच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं की, शाहीन बागमध्ये रस्ते बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. भाजपला हा मार्ग खुला करायचा नाही. माझी याला मान्यता आहे. भाजपने हा मार्ग खुला करावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आम आदमी पक्षाला या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत होते. 


शाहीन बाग या ठिकाणी विरोध निदर्शनं सुरु आहेत. केजरीवालांनी म्हटलं की, 'देशात संविधानानुसार सगळ्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. पण यामध्ये सामान्य व्यक्तींना त्रास नाही झाला पाहिजे.'


'केंद्र सरकार हा मुद्दा का हाताळत नाही. पत्रकार परिषद घेण्याऐवजी शाहीन बाग येथे यावं. रविशंकर प्रसाद शाहीन बाग का येत नाहीत?' असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.