मुंबई : राज्यात सत्तानाट्यानंतर सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यांनतर विधिमंडळाच्या 2 दिवसीय विशेष अधिवेशनात शिंदे-भाजप सरकारने बाजी मारली. शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. एकूण 164 आमदारांनी सरकारला पाठिंबा दर्शवला. यानंतर एकनाथ शिंदे यांचं अनेक पक्षांकडून अभिनंदन करण्यात आलं. हे विशेष अधिवेशन सुरु असताना दुसऱ्या बाजूला आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. (delhi assembly session salary of mlas will be 90 thousand in delhi bill introduced in assembly)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विधानसभेचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी आम आदमी पार्टीकडून (AAP) वेतनवाढीचं विधेयक ठेवण्यात आलं.


दिल्ली विधानसभा सदस्यांच्या वेतनवाढीबाबत मंत्री कैलाश गेहलोत यांनी सभागृहासमोर मंत्री, आमदार, सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेता यांच्या वेतनवाढीचं विधेयक आणि भत्त्यांसंबंधित 5 विधेयकं सादर केली. ही पाचही विधयेक सभागृहात मांडलं.


या प्रस्तावानुसार,  आता दिल्लीतील आमदारांना वेतन म्हणून दरमहा  12 ऐवजी 30 हजार रुपये मिळणार आहे. वेतनाव्यतिरिक्त इतर भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. आमदारांना वेतन आणि इतर भत्ते असं एकूण 90 हजार रुपये मिळणार आहेत. आधी ही एकूण रक्कम 54 हजार इतकी होती. दिल्लीतील आमदारांना अखेरीस 2011 मध्ये पगारवाढ देण्यात आली होती.