मुंबई : काही दिवसांपूर्वी डोळ्याच्या पांढर्‍या  भागावर टॅटू करण्याचा नादामध्ये कॅनेडियन मॉडेलने दृष्टी गमावल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकाराला 'स्किरा टॅटू' म्हणतात. 


'स्किरा टॅटू' हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. परंतू हा धोका पत्करूनही डोळ्याच्या पांढर्‍या भागावर टॅटू गोंदवण्याचा यशस्वी प्रयत्न दिल्ली स्थित करण किंगने केला आहे. करण हा टॅटूप्रेमी आहे. त्याने 'स्किरा टॅटू' केल्यानंतर इतरांसाठी खास संदेश दिला आहे. 



 


करणने अशाप्रकारचे टॅटू गोंदवण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायला हवी ? टॅटू पार्लरची निवड कशी करायची या बाबतचा सल्ला दिला आहे. 


दिवसेंदिवस टॅटू बनवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये अनेक ट्रेंडही निर्माण होत आहेत.  पण आंधळेपणाने कोणतीही फॅशन फॉलो न करता पुरेशी काळजी घेऊनच तुमची हौस पुरी करा.