नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अनेक विक्रम मोडले आहेत. 13 दिवसात या सिनेमाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त (Tax Free) करण्याचा मुद्दा दिल्ली विधानसभेत (Delhi Assembly) उपस्थित करत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना एक सल्ला दिला आहे.


विधानसभेत अरविंद केजरीवाल यांचं विधान
विधानसभेच्या अधिवेशनात संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले  'द कश्मिर फाईल्स' सिनेमा टॅक्स फ्री करण्याची काय गरज? इतकीच इच्छा असेल तर विवेक अग्निहोत्रीला सांगा की सिनेमा युट्यूबवर टाकावा, म्हणजे सर्वांना तो सिनेमा मोफत बघता येईल, टॅक्स फ्री करण्याची काय गरज? कश्मिरी पंडितांच्या नावाखाली करोडो रुपये जमा केले जात आहेत, असं केजरीवाल यांनी म्टटलं आहे. 


केजरीवालांच्या सल्ल्यावर अनुपम खेर संतापले
अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर अभिनेते अनुमप खेर (Anupam Kher) यांनी संताप व्यक्त केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलंय, मित्रानों आता तर सिनेमागृहात जाऊनच कश्मिर फाईल्स बघा, 32 वर्षांनंतर #KashmiriHinds चे दु:ख  सर्वांना कळलं आहे. त्यांच्यावर झालेला अत्याचार समजून घ्या. पण जे या घटनेची खिल्ली उडवत आहेत. कृपया त्यांना तुमच्या ताकदीची जाणीव करून द्या, असं अनुमप खेर यांनी म्हटलं आहे. 


या राज्यात सिनेमा टॅक्स फ्री
'द काश्मीर फाइल्स' हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि पलायन यावर आधारित आहे.