भारतातील `या` शहरात कोरोना वाढला, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?
कोरोनाचा (Corona) जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
मुंबई : कोरोनाचा (Corona) जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तर मास्क घालणंही ऐच्छिक केलंय. सर्वांचा कोरोना गेलाय, असा समज झालाय. मात्र हा गैरसमज आहे. कोरोना हळुहळु डोकं वर काढतोय. या कोरोनाने राजधानी दिल्लीत हैदोस घातलाय. (delhi corona update 24th april 2022 today 1 thousand 83 people corona positive found)
दिल्लीत दिवसभरात 1 हजारापेक्षा कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत 24 तासांमध्ये 1 हजार 83 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तर एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दिल्लीचा पॉझिटिव्ही रेट हा 4.48 इतका आहे.
तसेच दिवसभरात 812 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या दिल्लीती सक्रीय रुग्णांमध्ये वाढ होऊन एकूण संख्या 3 हजार 975 झाली आहे.