Delhi Crime : दिल्लीतून (Delhi News) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका माथेफिरु प्रियकराने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर चाकूने तब्बल 13 वेळा वार केले आहेत. आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर चाकूने निर्दयीपणे वार केले आहेत. दिल्लीत रस्त्याच्या मधोमध बळजबरीने कॅबमध्ये (Cab) घुसून आरोपीने हे कृत्य केले आहे. मात्र पोलिसांना (Delhi Police) काहीच सुगावा लागला नाही. या हल्ल्यानंतर मुलीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या लाडो सराय परिसरात 23 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून आरोपीने 13 वेळा चाकूने वार केले आहेत. तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका मल्टी नॅशनल कंपनीत रिक्रूटर म्हणून काम करणारी पीडित तरुणी गुरुवारी सकाळी विश्वास नगरमध्ये मुलाखतीसाठी जात होती. मात्र आधीच तिची वाट पाहत असलेल्या आरोपी गौरव पालने तिला रुग्णालयात पोहोचवलं आहे.


नेमकं काय घडलं?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गौरव पालने सकाळी आठ वाजता तरुणीसोबत संवाद साधला होता. त्यावेळी तरुणीने आपण ऑफिसमध्ये असल्याचे त्याला सांगितले होते. आपण सकाळी सहा साडेवाजताच ऑफिससाठी निघत असल्याचे तरुणीने गौरवला सांगितले होते. त्यानंतर तरुणीने गौरवचा नंबर ब्लॉक करुन टाकला होता. त्याआधी तरुणी 10 ते 12 दिवस आधी भेटली देखील होती. मात्र तिला गौरवमध्ये फारसा रस नव्हता. त्यामुळे ती गौरवकडे दुर्लक्ष करत होती. त्यानंतर अचानक गुरुवारी गौरव पहाटेच पीडितेच्या घराच्या बाहेर येऊन उभा राहिला.


पीडित तरुणी मुलाखतीसाठी निघाल्यानंतर गौरवने तिला थांबवलं आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित तरुणीने त्यासाठी नकार दिला. मी तुला ऑफिसला सोडतो असेही गौरवने तरुणीला सांगितलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणीने गौरवच्या कानाखाली लगावली. त्यानंतर तरुणी कॅबमध्ये जाऊन बसली. तिच्या मागोमाग गौरव देखील गाडीत जाऊन बसला आणि त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.


तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी तात्काळ गौरवला पकडं आणि पोलिसांना याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत पीडित तरुणी जबर जखमी झाली होती. तरुणीच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर रक्तच रक्त होतं. मला लवकर दवाखान्यात घेऊन चला असं ती वारंवार लोकांना सांगत होती. लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.