Delhi Girl Acid Attack CCTV : बहिणीसोबत उभ्या असणाऱ्या शालेय विदयार्थिनीवर भर दिवसा Acid Attack
आज सकाळी 9 वाजता आपल्या लहान बहिणीबरोबर विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकलं, धक्कादायक CCTV फुटेज समोर
Delhi Girl Acid Attack Caught on Cam : शालेय विद्यार्थिनीवर भरदिवसा अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अॅसिड हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. पीडित मुलगी 17 वर्षांची असून आज सकाळी नऊ वाजता ती आपल्या लहान बहिणीबरोबर रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी मोटरसायकलवरुन दोन तरुण आले. यातल्या मोटरसायकलवर मागे बसरलेल्या तरुणाने त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं, आणि तिथून ते फरार झाले. पीडित मुलीने दोन मुलांवर संशय व्यक्त केला असून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
नेमकी काय आहे घटना?
दिल्लीतल्या द्वारका (Delhi Dwarka) परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी बारावीच्या विद्यार्थिनीवर अॅसीड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात असून पीडित मुलीला दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचे आहेत.
दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु
पीडित मुलगी सकाळी कॉलेजला जात असताना आरोपीने हा हल्ला केला. द्वारका मेट्रो स्टेशनजवळ पीडित मुलगी उभी असताना हा हल्ला झाला. पीडित मुलगी मोहन गार्डन परिसरात रहाते. आज सकाळी 9 वाजता हा हल्ला झाला. अॅसिड हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. या घटनेने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी एका आरोपीला केलं अटक
भरदिवसा झालेल्या अॅसिड हल्ल्याची दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात आहे.