नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना मंगळवारी 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपसमोर दंड थोपटले. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराशी मी आमनेसामने चर्चेसाठी तयार आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत दिल्लीतील प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्यात यश मिळवले आहे. भाजपला केजरीवाल यांच्याविरोधात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अद्याप एकही सक्षम नेता सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी भाजपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हान देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 


आमच्याकडे केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे- जावडेकर


दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अगोदरपासूनच दिल्लीत झंझावाती प्रचार करत आहेत. 


जामिया आणि शाहीन बागेतील आंदोलनामागे राजकीय डिझाईन- मोदी



दरम्यान, आज 'आम आदमी पक्षा'कडून (आप) पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये सफाई कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आता सामान्य जनता आणि कामगार वर्ग आपले मत 'आप'च्या पारड्यात टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.