Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये पूराचं थैमान सुरु असतानाच आता यमुनेचं पाणी थेट ताजमहालापर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. किंबहुना अनेकांनी ताजमहाल पाण्याखाली गेल्याचंही म्हणण्यास सुरुवात केली आहे. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं एएसआयच्या अहवालातून समोर आलंय. जात महालापर्यंत पूराचं पाणी पोहोचलं खरं पण, ते संरक्षक भींतीपर्यंतच आलं असून, मुख्य वास्तूला मात्र ते स्पर्शू शकलेलं नाही आणि या वास्तूचं स्थापत्य आणि त्याची अनोखी रचना यास कारणीभूत ठरत असल्याचं ASI नं स्पष्ट केलं. (Delhi Floods Taj Mahal design prevents flooding of main monument know the reason)


स्थापत्यशास्त्राची कमाल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ASI च्या प्रिन्स वाजपेयी यांनी यमुनेचा पूर आणि ताजमहालासंबंधी माहिती देत म्हटलं, 'ताजमहालाची बांधणीच मुळात अशा पद्धतीनं करण्यात आली होती की, त्याच्या मुख्य वास्तूमध्ये (मध्यभागी असणाऱ्या भव्य कबरीमध्ये) पूराचं पाणी शिरुच शकणार नाही'. वाजपेयी यांच्या माहितीनुसार 1978 मध्ये जेव्हा यमुनेची पाणी पातळी वाढली होती त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीनं ताजमहालाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या भींतीपर्यंतच पूराचं पाणी पोहोचलं होतं. 


हेसुद्धा वाचा : ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण 


सध्याच्या घडीला ताजमहालाच्या मागच्या बाजूला असणारी बाग ही पुरातन नसून, ती काही दशकांपूर्वी तयार करण्यात आली, जिथपर्यंत पूराचं पाणी पोहोचलं. 


1978 च्या पूराच्या आठवणी... 


सध्याच्या घडीला दिल्लीमधील काही भागांतून पूराचं पाणी ओसरलं असलं तरीही यमुनेची पाणी पातळी अद्यापही धोक्याच्या आकडेवारीहून वरच असल्याचं सांगण्यात येत आहे. 1978 मध्ये अशीच परिस्थिती ओढावल्यामुळं दिल्ली जलमय झाली होती. त्यावेळ यमुनेच्या पाणी पातळीनं 508 फूटांचा आकडा गाठला होता, ज्यामुळं ताजमहालाच्या बसई घाट बुरूजापर्यंत हे पाणी पोहोचलं होतं. पूराच्या पाण्याची पातळी इतकी होती की ताजमहालाच्या तळघरात असणाऱ्या 22 खोल्यांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला होता. ज्यानंतर ASI कडून ज्या लाकडी दरवाजांतून पाणी आत आलं ते काढून तिथं भक्कम भींती उभारण्यात आल्या.


दिल्लील पूराची सद्यस्थिती काय? 


सध्याच्या घडीला दिल्लीच्या काही भागांसोबतच आग्रा आणि मथुरा येथील सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एनडीआरएफ, पोलीस आणि सदरील यंत्रणांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 50 ग्रामीण आणि 20 शहरी भागांतील जवळपास 500 नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पूराच्या पाण्यामुळं जवळपास 500 बिघा (1 बिघा म्हणजे 24.79 गुंठा) शेतजमीन प्रभावीत झाली असून, बहुतांश भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याचं वृत्त आहे.