मुंबई : दिल्लीतील मयूर विहार भागातील एका मोठ्या हॉटेलमधील बाथरुममध्ये मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह तातडीने पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे. डिसीपी पंकज सिंग यांनी गुरुवार (७ जून) ला हा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला असल्याची माहिती दिली.


काय आहे हे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसीपींनी सांगितले की, ६ जूनला या मुलीने बॉयफ्रेंडसोबत मयूर विहार भागातील होलीडे इन या हॉटेलमध्ये चेक इन केले. मात्र तो मुलगा संध्याकाळी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ७ जूनला त्याने आपल्या गर्लफ्रेंडला फोन केला. मात्र मुलीने फोन न उचलल्याने तो हॉटेलवर परतला आणि हॉटेल स्टाफशी बातचीत केली.


त्यानंतर मास्टर की ने रुमचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा बाथरुममध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीच्या तपासात पोलीसांना मुलीच्या शरीरावर जखमेचे कोणतेही निशाण दिसले नाहीत.



अनेक वर्षांपासून ओळख तरीही...


हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे मुलीच्या घरच्यांनी सांगितले. मृत मुलगी चाणक्यपुरीत राहणारी होती आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. तिचे वडील ड्रायव्हर आहेत. तर मुलगा शाहदरा येथे राहणार असून बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मुलाच्या वडीलांचा ट्रान्सपोर्टचा बिजनेस आहे. 


मुलगा-मुलगी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असले तरी मुलीच्या कुटुंबियांनी बॉयफ्रेंडवर संशय दर्शवला आहे. पोलिस मुलीच्या बॉयफ्रेंडची सखोल चौकशी करत आहेत. मात्र त्यांना पोस्टमार्टम रिपोटची प्रतीक्षा आहे. कारण त्यावरुन तपासाला दिशा मिळू शकते.