नवी दिल्ली :  ब्लू व्हेल या जीवघेण्या खेळाचं वेड किशोरवयीन मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या या खेळाच्या लिंक्स इंटरनेटवरून तात्काळ हटवा. अशा सूचना केंद्र सरकारने यापूर्वीच केल्या होत्या. 


ब्लू व्हेल खेळाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणीदरम्यान फेसबूक, गुगल, याहू या कंपन्यांच्या भारतातील युनिट्सना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.  तसेच याप्रकरणी कोणती पाऊलं उचलण्यात आली याबाबतही विचारणा करण्यात आली आहे.  


ब्लू व्हेल खेळाने ६ मुलांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या खेळावर बंदी घालण्याबाबतची याचिका अ‍ॅड गुरमीत सिंग यांनी केली आहे. या याचिकेदरम्यान सुनावणी करताना संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली आहे.  


तात्काळ ब्लू व्हेल खेळाच्या लिंक्स हटवा ही प्रमुख मागणी याचिका कर्त्यांनी केली आहे. त्यामुळे गुगल, याहू, फेसबुकसह केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनीही काय केले याचा अहवाल मागितला आहे. 


या याचिकेवरील पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.