कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर; सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक
दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती.
नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी, भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश कुमार गुप्ता आणि 'आप'चे नेते संजय सिंह सहभागी झाले होते. याशिवाय, अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांना कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आपापल्या सूचना मांडल्या.
आनंदाची बातमी: अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह
भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्लीच्या रुग्णालयांतील खाटांची संख्या आणखी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल कुमार यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली.
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा 'तो' निर्णय बदलला
दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे. परंतु केवळ केंद्र सरकारच त्याची घोषणा करू शकते, असेही जैन यांनी सांगितले होते. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही गेल्या काही दिवसांपासून ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर आज त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.