२३ जानेवारीला दिल्लीत शॉपिंगसाठी बाहेर पडू नका, बाजारपेठा राहणार बंद
दिल्लीतील व्यावसायिक परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत आहे. या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील व्यावसायिक परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत आहे. या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीतील व्यापारी संघटना कॅट (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स)ने २३ जानेवारी रोजी दिल्लीतील व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केलीय.
कॅटने बंदची घोषणा करताना म्हटलं आहे की, न्यायालयाच्या आदेशाचा गैरफायदा घेत दिल्ली मनपा व्यापाऱ्यांवर कारवाई करत आहे.
व्यापाऱ्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवून ही कारवाई केली जात आहे त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
शनिवारी कॅटने एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीनंतर बंद घोषित करण्यात आला आहे. या बैठकीत ४०० प्रमुख व्यापारिक संघटनांचे व्यापारी नेता उपस्थित होते. या बंदमुळे दिल्लीतील सर्व बाजारातील दुकानं बंद राहतील आणि व्यवसायही बंद राहतील असे कॅटने म्हटलयं.