Delhi Metro : हद्दच झाली! महिलेला पाहताच तरुणाने केलं हस्तमैथुन, घाणेरडे कृत्याचा Video Viral
Delhi Metro : दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा एका तरुणाने महिलेला पाहताच घृणास्पद कृत्य केलं आहे. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Delhi Metro : दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोमधील अश्लील आणि घृणास्पद व्हिडीओमुळे चर्चेत असते. कधी तरुणी तरुणीचा रोमान्स, प्रवाशांसमोर किस करणं, तर कधी अश्लील चाळे...दिल्ली मेट्रोमधील या धक्कादायक आणि अश्लील व्हिडीओमुळे दिवसेंदिवस बदनाम होत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासन आणि दिल्ली महिला आयोगाने वारंवार या लोकांना इशारा देऊनही अश्लील वृत्ती असलेल्या लोकांचे कृत्य थांबत नाही आहे. (delhi metro station masturbation in front of girls Latest Viral Video Trending News today)
यावेळी मेट्रो स्टेशनवर महिलेकडे पाहून एका व्यक्तीने हस्तमैथून केलं आहे. हे अश्लील कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
ती महिला तुघलकाबाद स्टेशनवरून चढानंतर ती मंडी हाऊस मेट्रो स्टेशनला उतरली. त्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उतरली आणि मैत्रिणीची वाट पाहत बसली होती. दुसरीकडे प्लॅटफार्म क्रमांक 2 वर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने महिलेला पाहून हस्तमैथून आणि घाणेरडे हातवारे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सीआरपीएफकडे तक्रार केली.
त्या महिलेच्या तक्रारीनंतर सीआरपीएफचे जवान मेट्रो स्टेशनवर तत्काळ पोहोचले. मात्र तोपर्यंत तो आरोपी मेट्रोमध्ये बसून पळून गेला होता. त्यानंतर महिलेने प्रगती मैदान मेट्रो स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटजे तपासण्यात आले. या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली आणि त्यांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली.
तपास असं दिसून आला सदर आरोपी बेगमपूरच्या राजीव नगरमध्ये राहणारा असून तो नांगली मेट्रो स्टेशनवर उतल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी त्यानंतर त्याला तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.