Delhi Metro Viral Video Boy Wear Skirt: दिल्ली मेट्रो हा सध्या चर्चाचा विषय झाला आहे. काही दिवसांपुर्वी दिल्लीच्या (Delhi Metro News) मेट्रोमध्ये चक्क उर्फी जावेदप्रमाणे अत्यंत कमी कपडे घालून एका मुलीनं एन्ट्री केली होती. त्यावेळी हा फोटो सगळीकडेच चर्चाचा विषय बनला होता त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नानातऱ्हेच्या कमेंट्स (Delhi Metro Viral Video) करायला सुरूवात केली होती. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विचित्र आणि कमी कपड्यांमध्ये आलेल्या या तरूणीची अनेकांनी खिल्ली उडवली त्याचप्रमाणे ही आपली संस्कृती नाही, असं लज्जास्पद वर्तनही आपल्याला मान्य नाही असं म्हणत अनेकांनी त्या मुलीच्या या वागणूकीवर तिखट प्रतिक्रियाही केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर अनेकांनी याचे स्वागतही केले होते. दिल्ली मेट्रोमध्ये अशा अवतारात एक मुलगी प्रवास करते आणि तिच्या आजूबाजूला असणारी मंडळी तिच्या टीका करत नाहीत हे पाहूनही आपल्याला आनंद झाला असल्याचे अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिले होते. परंतु त्यानंतर हा ट्रेण्ड (Boys Wears Skirts) वेगवेगळ्या पद्धतीनं समोर आला आहे. आता मुलीनं नाही तर काही मुलांनी ही परंपरा दिल्ली मेट्रोतून पुढे चालवत चक्क मेट्रोमध्ये स्कर्ट घालत प्रवेश केला आहे. ज्याचा व्हिडीओ त्यांनी इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 


सध्या फॅशन ही बदलताना दिसते आहे. भारतीय तरूणांमध्येही आता वेस्टर्न कल्चरप्रमाणे हटके फॅशन फॉलो करण्याकडे भर दिसतो आहे. त्यामुळे सध्या अशी लोकं ही सोशल मीडियावर चांगलीच भाव खाताना दिसत आहेत. यातलं उत्तम उदाहरणं म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed). राखी सावंतप्रमाणे उर्फी जावेदही सगळीकडेच चमकताना दिसते आहे. आता यांचीच प्रेरणा घेत सर्वसामान्य लोकंही विक्षिप्त आणि कमी कपडे घालत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे दिल्ली मेट्रोतील ती व्हायरल झालेली मुलगी. आता दिल्ली मेट्रोमध्ये चक्क दोन तरूणांनी डेनिमचा स्कर्ट... (हो, बरोबर ऐकलंत स्कर्ट, जीन्स नाही...) घालत दिल्ली मेट्रोमध्ये एन्ट्री केली आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच चर्चाचा विषय ठरला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओला इन्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातून नेटकऱ्यांनीही या व्हिडीओखाली तूफान कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे दिल्ली मेट्रो आता हा शब्द पुन्हा इंटरनेटवर फिरू लागला आहे. sameerthatsit आणि _bhavyakumar यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून 36 हजार लाईक्स आले आहेत. या दोघांना पाहून दिल्ली मेट्रोवर आलेले प्रवासाही कपाळाला हात मारत होते.