Mughal Garden Name Changed : देशाची राजधानी दिल्लीत मुघल शासकांची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आहे. केंद्र सरकारने शनिवारी राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) जगप्रसिद्ध मुघल गार्डनचं (Mughal Garden) नावही बदललं आहे. जगप्रसिद्ध राष्ट्रपती भवनाच्या सुंदर मुघल गार्डनचं नामकरण करण्यात आलं आहे. मुघल गार्डन आता अमृत गार्डन (Amrit Udyan) म्हणून ओळखलं जाईल. अमृत गार्डन आता सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत खुलं राहणार आहे. (Delhi Mughal Garden Name Changed now known as amrit udhyan in rashtrapati bhavan latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्तानं 'आझादी का अमृत महोत्सव' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हीच संकल्पना लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे नवं नामकरण केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या प्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी शनिवारी एका निवेदन (Press Note) जाहीर केलं. या निवेदनात या नवीन नामकरणाची माहिती दिली.


अमृत उद्यान  (Amrit Udyan) 31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत जास्तीत जास्त 2 महिने खुलं राहणार आहे. यंदाही पावसाळ्यात उद्यान खुलं राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षातून दोन वेळा हे गार्डन खुलं असणार आहे. ट्यूलिप (Tulip) आणि गुलाब (Rose) ही फुलं विशेष आकर्षण असतात.


आणखी वाचा - Plane Crash : भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; सुखोई-30 आणि मिराज 2000 चा चक्काचूर


दरम्यान, जे विद्यार्थी पीएचडी करत आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. भेटीसाठी शासनाने काही खास कॅटेगरी तयार केल्या आहेत. 28 ते 31 मार्च असे दिवस ठरवण्यात आलेत. 28 मार्चला शेतकऱ्यांसाठी खुलं असणार आहे. तर 31 तारखेला महिलांसाठी खास दिवस ठेवण्यात आला आहे.