Earthquake Effects in Delhi-NCR Video : अफगाणिस्तानमध्ये आलेल्या तीव्र भूकंपाचे धक्के उत्तर भारताताही दिसून आले. दिल्ली एनसीआरमध्ये अचानक रात्रीच्या वेळी भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच भीतीदायक वातावरण निर्माण झालं. सगळेकडे धावपळ...रात्री 10 वाजता आलेल्या या भूकंपानंतर लोक घराबाहेर पडली. धक्कादायक म्हणजे भूकंपानंतर दिल्लीतील अनेक इमारती झुकल्याचा अहवाल दिल्ली अग्निशमन दलाने दिला आहे. (delhi ncr earthquake 2023 Effects people rush out of houses Shocking video viral on Social media )


अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ समोर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये जाणवलेल्या 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे दिल्लीसह अनेक भारतीय शहरांतील नागरिकांनाही घाबरुन सोडलं. 




अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात केंद्रबिंदू असलेल्या या ठिकाणी भूकंप दोन मिनिटांपर्यंत होता. भूकंपाचे केंद्र पाकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या अफगाणिस्तानच्या जुर्म शहरापासून 40 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होते. 



भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर मोठ्या मोठ्या इमारतीतून रहिवाशी पायऱ्यांनी खाली उतर मोकळ्या मैदानात तर कुठे बागे आसरा घेताना दिसले. 



भूकंपानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि ते घर सोडून बाहेर पडले. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 मोजण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू उत्तर अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता.




या भूकंपाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक ठिकाणी भिंती तडे गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणंय. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीक घरातून बाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात आले.