Exclusive Report: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  मध्य आशियातील (Middle Asia) महिला आणि मुलींना फसवून वेश्या व्यवसायाच्या (prostitution) दलदलीत ढकललं जात होतं. भारतासह 7 देशांमध्ये ही आंतरराष्ट्रीय टोळी (Internation Racket) सक्रिय होती. या टोळीतील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उझबेकिस्तानमधल्या महिलांची फसवणूक
फसवणूक करण्यात आलेल्या मुलींमध्ये बहुशांत मुली या मध्य आशियातल्या उझबेकिस्तान (uzbekistan) देशातल्या आहेत. या मुलींना मोठ्या हॉटेलमध्ये नोकरीचं आमीष दाखवून दुबई (Dubai) आणलं जात होतं, तिथून त्यांना नेपाळ (Nepal) आणि त्यानंतर यूपी (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar) बॉर्डर पार करुन दिल्लीत (Delhi) आणलं गेलं. दिल्लीत या मुलींची वेश्याव्यवसायासाठी विक्री केली जात होती.


एका मुलीने सांगितली आपबीती
एका पीडित महिलेने सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. या मुलीने सांगितलं मला नेपाळमार्गे दिल्लीत आणण्यात आलं. मला एका महिलेने सांगितलं, माझ्या मुलाची तब्येत ठिक नसते, त्याला सांभाळण्याचं काम करावं लागेल या बदल्यात तुला पगार दिला जाईल. पण जेव्हा दिल्लीत आले तेव्हा मला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं. 


'मी खूप रडले, विनवणी केली, पण त्यांनी माझा पासपोर्ट हिसकावून घेतला. माझ्या असहायतेचा फायदा घेतला गेला. त्यामुळे इच्छा नसतानाही मला हे काम करावं लागलं' अशी व्यथा या मुलीने मांडली.


पासपोर्ट आणि विजा नसल्याने पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास जेलमध्ये टाकण्याची भीती या मुलींना होती. त्यामुळे जवळपास गेली सात महिने या मुली वेश्याव्यवसाय करत होत्या. यातल्या तीन मुलींनी हिंमत करत उझबेकिस्तान दूतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण याची भनक त्या टोळीला लागली. त्यांनी या मुलींना जबर मारहाण केली.


अशी झाली मुलींची सुटका
अखेर नशिबाने या मुलींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर निघण्याचा मार्ग सापडला. 23 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी छापा टाकून 5 मानवी तस्करांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून दिल्लीत एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याची माहिती समोर आली. उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान आणि कझाकिस्तानमधून महिलांना दुबई आणि नेपाळमार्गे भारतात आणलं जातं आणि त्यांना ओलीस ठेवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर 3 मुलींनी 23 ऑगस्टला उझबेकिस्तान दूतावास गाठलं. पण त्या तिथे पोहोचण्याच्या आधीच या टोळीची प्रमुख अजीजा शेर नावाची अफगाणी महिला तिथे पोहोचली. तिच्याबरोबर तिचा पती शेरजात हा देखील होता. या दोघांनी मुलींना मारहाण करत आपल्याबरोबर नेलं. यातली एक मुलगी मात्र त्यांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाली. तिने उझबेकिस्तान दूतावास गाठत सर्व घटना सांगितली. यानंतर दूतावासातील अधिकाऱ्यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली.


मिळलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत या मुलींची टोळीच्या तावडीतून सुटका केली. त्यांना एका एम्पॉवरिंग ह्युमॅनिटी नावाच्या एनजीओकडे सोपवलं. सोडवण्यात आलेल्या मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार एकुण 7 मुली या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकल्या होत्या. या टोळीची प्रमुख अजीजा शेर नावाची महिला आहे. याशिवाय तिचा पती शेरजात, मरियम, जुमायेवा अजीजा तसंच जुबैर हाशमी नावाचा एक वकिलही या टोळीत सहभागी आहे. 


या मुलींना दिल्ली शिवाय पंजाबमधल्या लुधियाना इथे वेश्या व्यवसायासाठी पाठवलं जायचं. धक्कादायक म्हणजे यातल्या काही मुलींचा गर्भापतही करण्यात आला होता.