कुतुब मिनारसमोर हनुमान चालिसा आंदोलन, कुतुब मिनारचं नाव बदलण्याची मागणी
कुतुब मिनारसमोर हनुमान चालिसाचं पठण, कुतुब मिनारचं नाव बदलण्याची मागणी
दिल्ली : दिल्लीतल्या कुतुब मिनार (Qutub Minar) परिसरात हिंदू संघटनांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आंदोलन केलं. कुतुब मिनारचं नाव बदलावं, अशी या संघटनांची मागणी आहे. हिदुत्ववादी संघटना युनायटेड हिंदू फ्रंटच्या (United Hindu Front) कार्यकर्त्यांनी आज कुतुब मिनारसमोर हनुमान चालिसा वाचली.
कुतुबमिनारचं नाव बदलून विष्णू स्तंभ करावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कुतुब मीनार हा आधीचा विष्णू स्तंभ आहे. तसंच जैन आणि हिंदू मंदिरं तोडून कुतुबमिनार बांधण्यात आला, असा दावा या संघटनेनं केलाय.
इथे हिंदू आणि जैन मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आणि हिंदूंना पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आलीय.