Dog Attack : कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये (Dog Attacks ) दिवसेंदिवस वाढ होतं आहे. पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये (Lift) पुन्हा एका पाळीव कुत्र्याने लहान मुलीवर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. दिल्लीजवळच्या नोएडा (Delhi Noida) भागातील एका खासगी सोसायटीत लिफ्टमध्ये असलेल्या लहान मुलीवर पाळिव कुत्र्याने हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय घडलं नेमकं?
दिल्लीतल्या नोएडामधल्या एका उच्चभ्रू खासगी सोसायटीत ही घटना घडली आहे. नोएडच्या सेक्टर 107मधल्या लोटस-300 नावाच्या इमारतीत लहान मुलीवर कुत्र्याने हल्ला केला. अंगावर काटा आणणारी ही घटना लिफ्टच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 


या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओत 8 ते 10 वर्षांची मुलगी एका लिफ्टमध्ये दिसतेय. एका मजल्यावर लिफ्ट थांबते आणि लिफ्टचा दरवाजा उघडतो. त्याचवेळी बाहेरुन एक पाळिव कुत्रा लिफ्टमध्ये शिरतो आणि त्या मुलीचा चावा घेतो. त्यानंतर मालक येऊन त्या कुत्र्याला बाहेर घेऊन जातो. धक्कादायक म्हणजे कुत्र्याचा मालक मुलीची साधी विचारपूसही करताना दिसत नाही. 


कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी
कुत्रा लिफ्ट बाहेर गेल्यानंतर मुलगी तात्काळ लिफ्टचं बटन बंद करते. कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेली ही मुलगी जोरजोरात रडतानाही या व्हिडित दिसत आहे. मुलीच्या उजव्या हातावर कुत्र्याने चावा घेतल्याचं या व्हिडिओत दिसतंय. 


सोसायटीतल्या लोकांचा संताप
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोसायटीतल्या लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोसायटीत पाळिव कुत्र्यांची दहशत वाढत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांमध्ये जास्त भीती असल्याचंही नागरिकांनी सांगितलं. मुलांना लिफ्टमध्ये एकटं पाठवणं किंवा सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळला पाठवतानाही भीती वाटत असल्याचं सोसायटीतल्या लोकांनी सांगितलं.



महापालिकेचा अंकुश नाही
दिल्लीतल्या नोएडा भागात पाळिव कुत्र्यांच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये अशी घटना घडल्यात. हाऊसिंग सोसायटीतल्या लोकांनी याबाबत दिल्ली महापालिकेतही तक्रार केली, पण महापालिकेने यावर कोणतंही कारवाई केलेली नाही.