नवी दिल्ली : पोलिसांनी आरोपीला मारहाण केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र या घटनेत एका महिला पोलिसानेच (female Sub Inspector) वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता महिला पोलिसांवर कारवाईची मागणी जोर धरतेय.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिला पोलिस उपनिरीक्षकाने (female Sub Inspector) आपल्याचं सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  (CCTV Camera) कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, स्थानिक पोलिसांसमोर महिला पोलिसाने (female Sub Inspector)  तिच्या सासऱ्याला एकापाठोपाठ एक थप्पड लगावल्या आहेत. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हते. याउलट दिल्ली पोलीसही हा तमाशा बघत राहिले पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.


तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला उपनिरीक्षकासोबत (female Sub Inspector)  दिसणारी महिला तिची आई आहे. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी ती तिच्यासोबत आली होती. ही घटना दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातील असून महिला एसआय डिफेन्स कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहे.



दरम्यान रविवारी महिला पोलीस कर्मचाऱ्याने (female Sub Inspector) आईसोबत येऊन सासरच्या मंडळींना मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवली असली तरी अद्याप आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.


महिला पोलिसाचा (female Sub Inspector)  व वृद्ध दाम्पत्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात सुरु असलेल्या या खटल्यावरूनच ही मारहाण झाल्याची माहिती आहे. दरम्यान महिला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्यावर कारवाईची मागणी जोर धरतेय.