नवी दिल्ली : दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शहरातल्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी केलीय. दिल्लीतल्या वायूप्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलीय. ही पातळी ४४८ वर पोहचलीय. दिल्लीतल्या हवेचा दर्जा धोकादायक असल्याच्या सूचना आयएमएनं दिल्या आहेत. तसंच घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही आएमएनं दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली हे गॅस चेंबर बनलं असून या महिन्यात दरवर्षी दिल्लीतलं प्रदूषण वाढतं. आजूबाजूच्या राज्यांमध्ये खरिपाचा हंगाम निघाल्यानंतर शेतातील कचरा जाळण्यात येतो आणि त्यामुळंच प्रदूषणाची पातळी वाढल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. 


दरम्यान, राजधानी दिल्लीतील वाढत्या वायु प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सीआयएसएफने दिल्ली विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि इतर सरकारी कार्यालयाबाहेर तैनात जवानांना ९ हजाराहून अधिक मास्क पुरवण्यात आलंय. सीआयएसएफचे डीजी ओ.पी. सिंह यांनी हे मास्क पुरवण्याचे आदेश दिले होते. कर्तव्य बजावत असणा-या जवानांना वायु प्रदूषणाचा त्रास होणार नाही या दृष्टीने हे मास्क पुरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.