चाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना
Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
Delhi Sakshi Murder Case: भारताची राजधानी दिल्ली (Delhi) हत्येच्या घटनेने हादरली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तरुणीसोबत झालेल्या वादानंतर आरोपी तरुणाने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूने वार केले आहेत. तब्बल तरुणीवर ४० वार करण्यात आले आहेत. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपीचे नाव साहिल असे असल्याची ओळख पटली आहे. (Delhi Teens Murder By Boyfriend)
या भयंकर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. साहिल तरुणीवर वारंवार चाकुने वार करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूला लोकंही आहेत. मात्र कोणीही त्याला विरोध करताना दिसत नाहीये. तसंच, तरुणीला वाचवण्यासाठीही कोणी पुढे यात नसल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. तरुणीवर हल्ला करत साहिल घटनास्थळावरुन फरार झाला आहे. जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
दिल्लीतील उत्तर जिल्ह्यातील शाहबाद पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. तरुणीच्या हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती घेऊन त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. मयत तरुणीचे नाव साक्षी असल्याचं समोर आलं आहे. हत्येच्या दिवशी ती गल्लीतून जात असताना अचानक साहिल तिच्या समोर आला व त्याने चाकू काढून तिच्यावर सपासप वार केले, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे.
पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या
साक्षीचे वय १६ वर्ष असून ती अल्पवयीन आहे. घटनास्थळावरुन जवळच ती राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि साहिल यांच्यात प्रेमसंबंध होते. रविवारी त्यांच्याच काही कारणावरुन वाद झाले होते. त्यानंतर साक्षी तिची मैत्रीण नितूच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जात असताना साहिलने तिला अडवले. त्यानंतर गल्लीतच गजबजलेल्या रस्त्यावर तिच्यावर चाकूने आणि दगडाने वार करत तिची हत्या केली.
साक्षीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी साहिल फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. लवकरच त्याला अटक करु अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानुसार, आधी तिच्यावर चाकूने ४० वार करण्यात आले. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या व्हिडिओत साहिल क्रूरपणे तिच्यावर वार करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे.