नवी दिल्ली : कतार एअरवेजचे QR579 हे विमान दिल्लीहून दोहाला जात होते. उड्डाणादरम्यान त्यात काही तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर विमान कराचीकडे (पाकिस्तान) वळवण्यात आले. विमान कराची विमानतळावर उतरले आहे. विमानात 100 हून अधिक प्रवासी होते. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.


विमानाला इमर्जन्सी लँडिंग का करावे लागले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतार एअरवेजने दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी दिल्लीहून दोहाकडे जाणारे विमान QR579 अचानक कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. त्यावेळी एकच खळबळ उडाली. 


विमानाच्या कार्गो होल्डमध्ये धुर निघत असल्याचे दिसून आला. वैमानिकांनी तत्काळा आणीबाणी घोषित केली. विमान कराचीमध्ये सुरक्षितपणे उतरले. जिथे विमानाला येथे आपत्कालीन सेवा मिळाली आणि प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले.



प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दोहा येथे नेले जाणार


सध्या या घटनेची चौकशी करण्यात येत असून प्रवाशांना दोहा येथे नेण्यासाठी मदत विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. कतार एअरवेजच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, त्यांना पुढील प्रवास योजनांमध्ये मदत केली जाईल.