दिल्लीकरांनी पुन्हा एकदा दाखवला अरविंद केजरीवालांवर विश्वास
विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल सरकारवर विश्वास दाखवला आहे. विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. आपच्या कार्यालयात फुलांनी सजावट करण्यात आली आहे. रस्त्यारस्त्यावर आपचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून येत आहेत. आप कार्यकर्त्यांकडून पेढे, लाडू वाटप करण्यात येतं आहे. एक छोटा आप समर्थक तर थेट अरविंद केजरीवाल यांच्या वेशभूषेत दिसून आला.
आपला मिळालेली आघाडी पाहाता पुन्हा एकदा आपचीच सत्ता दिल्लीत येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्ली निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. मात्र त्यापूर्वीच आपच्या कार्यालयाबाहेर विजयाचं सेलिब्रेशन सुरु झालंय. आम आदमी पार्टीला विजयाची पूर्णपणे खात्री असल्याकारणानेच त्यांनी सेलिब्रेशनची सुरुवात केली आहे.
दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा कायम राहिल्याचं यंदाच्या निकालानंतर दिसून येतं आहे. जनतेचे प्रश्न आणि जनतेचा विकास हा मुद्दा धरून केजरीवाल यांनी लढवलेल्या निवडणुकीत जनतेने 'आम आदमी पार्टीला' कौल दिला. त्यामुळे आता निकालात मारलेल्या मुसंडीनंतर आता आप कार्यालयाच्या बाहेर अरविंद केजरीवालचे आकर्षक असे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरवर लिहिलेला मजकूर सध्या सर्वाचंच लक्ष वेधून घेत आहेत.
दिल्ली निवडणुकीबाबत आत्तापर्यंत जे निकाल हाती आले आहेत त्यात आप अर्थात आम आदमी पार्टीने मुसंडी मारली आहे. त्यामुळे आपच्या कार्यालयात फुंग्यांनी, फुंलांनी सजावट करण्यात आली आहे. तसंच रस्त्यारस्त्यावर सर्वसामान्य व्यक्ती, तसंच आप कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येतो आहे.
दिल्ली निवडणुकीच्या निकालात आप ने मुसंडी मारल्यानंतर भाजप कार्यालयाच्या बाहेर पोस्टरबाजी करण्यात आलीय...विजयाने आम्ही अंहकारी होत नाही तर पराभवाने आम्ही निराश होत नाही अशा अर्थाची पोस्टरबाजी भाजप कार्यालया बाहेर करण्यात आली आहे.