दिल्ली : Weekend Curfew : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लावण्यात आला होता. कोरोनाच संसर्ग कमी होत असल्याने आता हा कर्फ्यू उठविण्यात आला आहे. (Weekend Curfew in Delhi)  दुकानांसाठी लागू असलेला सम-विषमही नसणार आहे. त्यामुळे सगळी दुकाने उघडी राहणार आहेत. मात्र, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाची घटती प्रकरणे पाहता दिल्लीतील वीकेंड कर्फ्यू आणि दुकानांवरील सम-विषम नियमही हटवण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर शनिवार आणि रविवारचा कर्फ्यू रद्द करण्यात आला असला तरी रात्रीचा कर्फ्यू अजूनही सुरुच राहणार आहे.


लग्न समारंभावरील निर्बंध कमी 


यासोबतच डीडीएमए बैठकीत लग्न समारंभावरील निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त 200 पाहुण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, जास्तीत जास्त 200 लोक किंवा क्षमतेच्या 50 टक्के लोकच समारंभाला उपस्थित राहू शकतील.


रेस्टॉरंट, पब आणि बार व्यतिरिक्त सिनेमा हॉल देखील उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, बार, रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉलमध्ये केवळ 50 टक्के क्षमतेची परवानगी असेल.


शिक्षण संस्था बंद राहणार


दिल्लीत 50 टक्के क्षमतेची सरकारी कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शैक्षणिक संस्था आणि शाळा अजूनही बंद राहतील. शाळा सुरु करण्याबाबत पुढील बैठकीत निर्णय होऊ शकतो.


दिल्ली सरकारचा आठवडाभरापूर्वी प्रस्ताव  


दिल्ली सरकारने एका आठवड्यापूर्वी (21 जानेवारी) दिल्लीत लादलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याची शिफारस केली होती, परंतु लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल दिल्लीतील वीकेंड कर्फ्यू उठवण्याच्या बाजूने नव्हते आणि म्हणाले की कोविड -19 ची स्थिती सुधारेपर्यंत स्थिती कायम राहिली पाहिजे.  


दिल्लीत संसर्ग दर 10.59 टक्के


दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि काल (26 जानेवारी) दिल्लीत 7498 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत संसर्ग दर 10.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी 25 जानेवारीला 6028, 24 जानेवारीला 5760, 23 जानेवारीला 9197 आणि 22 जानेवारीला 11486 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच वेळी, 21 जानेवारी रोजी दिल्लीत 10756 प्रकरणे नोंदवली गेली, तर 20 जानेवारी रोजी 12306 रुग्ण नोंदवले गेलेत.