नवी दिल्ली : रस्त्यात छेड काढणा-या तरुणाला तरुणीने रस्त्यातच चोप दिल्याची घटना दिल्लीत समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीच्या ठिकाणी काही तरुण तरुणीची छेड काढत होते. तरूणांच्या या वागण्याला सडेतोड उत्तर देत तरूणींनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. 


दिल्लीच्या मार्केटमधील घटना


२५ फेब्रुवारीला ही घटना घडल्याचं कळत आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत करोल बागमधील गफ्फार मार्केटमध्ये फिरत होती. अचानक तरूणांच्या टोळक्याने तिची छेड काढत घाणेरडी शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तरुणी तेथून पुढे निघून गेली. पण तरूण पुन्हा तिचा पाठलाग करत गेले. त्यांनी अश्लील कमेंट्स करण्यास सुरुवात केली. मात्र यानंतर तरुणी संतापली आणि तिने रिक्षातून उतरुन एका तरुणाच्या कानशिलात लगावली. 



तरूणीने घडवली अद्दल


हा सगळा प्रकार पाहून तिथे आजूबाजूचे लोक जमा झाले. गर्दी पाहून छेड काढणारा तरुणही घाबरला आणि माफी मागू लागला. नंतर ताई माफ करा अशी विनवणी तो करु लागला. तरुणीने तरुणाला कॉलर पकडून पोलीस ठाण्यापर्यंत नेलं आणि तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मनीष आणि अभिषेक नावाच्या दोन तरुणांना अटक केली आहे.