नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा 2020 च्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अगदी पहिल्या अर्ध्या तासाच आपने मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नक्की कुणाला असणार आहे? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. ओखला - जर या विधानसभा निवडणुकीत एखाद्या जागेची चर्चा जोरदार झाली असेल तर ती जागा आहे ओखला जागा. देशभराचं लक्ष वेधून घेणारा शाहीन बाग हा परिसर याच विधानसभा क्षेत्रात येतो. शाहीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सीएए-एनआरसी विरोधी आंदोलन झाली. भाजपकडून शाहीन बाग निवडणुकीचा मुद्दा अधोरेखित केला जात होता. 


2. नवी दिल्ली - हा दिल्लीतील सर्वात हायप्रोफाइल असं क्षेत्र आहे. मुख्यंमत्री केजरीवाल यांचं हे मतदानक्षेत्र आहे. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित देखील इथूनच निवडणुक लढवली होती. 2013 मध्ये केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्यावर मात करत दिल्लीच्या राजकारणाची संपूर्ण गणितं बदलली. 


3. चांदनी चौक - हे मतदार क्षेत्र देखील कायम चर्चेत असतं. या जागेवर तेच उमेदवार आहेत ज्यांनी आधीची निवडणुक लढवली. मात्र यंदा ते वेगवेगळ्या पक्षांकडून लढत आहे. गेल्या निवडणुकीत आपकडून निवडणुक लढवलणारी अलका लांबा यंदा काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर आपने प्रल्हाद सिंह साहनी यांनी उमेदवारी दिली आहे. जे गेल्यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. तर भाजपने सुमन कुमार गुप्ता यांनी रिंगणात उतरवलं आहे. 


4. कालकाजी - या जागेवर आपकडून आतिशी मार्लेना आणि काँग्रेसकडून शिवानी चौपडा मैदानात उतरले होते. तर भाजपकडून धर्मवीर सिंह यांनी मैदानात उडी घेतली होती.



5. ग्रेटर कैलाश - दिल्लीतील सर्वात पॉश विभाग म्हणून ग्रेटर कैलाशकडे पाहिलं जातं. या मतदारक्षेत्राकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. आपकडून सौरभ भारद्वाज, भाजपकडून शिखा राय आणि काँग्रेसकडून सुखबीर सिंह पवार यांच्यात लढत होती. सौरभ आधीच्या निवडणुकीत आपच्या जागेवरून निवडणून आले होते.