नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्ली धुक्यात हरवलीय. दिल्ली आणि नोएडात दाट धुके पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिक देवदर्शनासाठी बाहेर जातात. मात्र धुक्यामुळे सकाळी तुरळक वाहनं पाहायला मिळत होती. या धुक्यामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडलीय. 


दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला असून दिल्ली विमानतळावरील सगळी उड्डाणं रद्द करण्यात आलीत. 



तसंच धुक्यामुळे रेल्वेसेवाही विस्कळीत झालीय. पन्नासहून अधिक ट्रेन्स उशिराने धावतायत.