मुंबई : आपल्या देशातील अनेक लोकं जुगाडू आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना नेहमीच काही ना काही जुगाड दिसतो. भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही. इथे तुम्हाला असंख्य अशी माणसे बघायला मिळतील, ज्यांनी जुगाड करून काही ना काही बनवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनमध्ये लोकांना बसल्या बसल्या झोप लागते. परंतू अनेकांना तसे झोपता येत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे.



या फोटोमध्ये एका व्यक्तीने बसल्या बसल्या झोपण्यासाठी वाखाणण्याजोगा जुगाड केला आहे.  3-4 लोकांमध्ये आपल्याला निवांत झोपता यावे यासाठी त्याने हा जुगाड केला आहे. या व्यक्तीने डोक्याला मोठा रुमाल बांधला आहे. या रुमालाचे दुसरे टोक वर असलेल्या लोखंडी कॅरीला बांधण्यात आले आहे.ज्यामुळे त्या व्यक्तीला बसल्या बसल्या झोप घेता येईल आणि झोपेत पडणार देखील नाही. या व्यक्तीचा हा जुगाड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.