मुंबई : भारतीय लोक हे त्यांच्या जुगाडासाठी जगभरात ओळखले जातात. भारतींयांसारखा जुगाड कोणीच कधी करु शकत नाही असे म्हणतात आणि यासंदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. लोकांना असे व्हिडीओ पाहायला फार आवडतात. लोक अशा जुगाडू लोकांचं कौतुक करतात आणि त्यांचे व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर करतात. ज्यामुळे अशा जुगाडू लोकांना प्रसिद्धी मिळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांनी आपल्या डोक्याला हात लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर या व्हिडीओमधील तरुण असा काही जुगाड करतो की, तो फ्रीमध्ये आपल्या गाडीची टाकी फुल करतो.


नक्की काय जुगाड केला?


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा बाईक चालवताना दिसत आहे. यावेळी तो हे सगळं आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करत असतो. परंतु असं करताना त्याच्या लक्षात येतं की, पेट्रोल संपत आला आहे. गाडीचा पेट्रोल काटा देखील त्याला तेच दर्शवत असतं. परंतु त्यानंतर हा तरुण असं काही तरी करतो की, गाडी न थांबवता त्याच्या गाडीचा काटा इंधन टाकी फुल असल्याचं दाखवतं.


खरंतर हा तरुण जेव्हा त्याच्या गाडीचा इंधन मीटर खाली म्हणजेत एम्पटी दाखवत असतो, तेव्हा त्या मीटरचं कव्हर खोलतो आणि इंधन काट्याला आपल्या हाताने फुलकडे घेऊन जातो. ज्यानंतर गाडीचा इंधन काटा फुल वरतीच राहातो. ज्यामुळे या तरुणाला आपल्या गाडीमधील इंधन फुल भरलेलं असल्याचं दिसतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ memecentral.teb नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो शेअर करताना त्यावर लिहिले आहे की, हा एकच मार्ग आहे, पेट्रोलची टाकी फुल करण्याचा.


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या जुगाड व्हिडीओला पाहून लोकांना आश्चर्य वाटले आहे. परंतु तरीही त्यांना हसू आवरता आले नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 45 हजार वेळा पाहिला गेला आहे.


यासोबतच या व्हिडीओला 10 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. यासोबतच यावर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत.