नवी दिल्ली : मोदी सरकार जनतेसाठी नवनवीन योजना आणत असते. तसेच या योजनेत हातभार लावणाऱ्यांनाही प्रोत्साहनपर मदत केली जाते. आता मोदी सरकार एका कॉंन्टेस्टद्वारे तरुणांना ५० हजार रुपये कमविण्याची संधी देत आहे. यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घेण्याची गरज नाही. काही मिनिटांत तुम्ही ५० हजार पर्यंत रक्कम कमावू शकता.


भारतनेट प्रोजेक्टमध्ये सहभाग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचविण्यास सुरूवात केली आहे. यासाठी ग्रामीण भारतात भारतनेट नावाचा प्रोजेक्ट सुरू झालाय. या प्रोजेक्टच्या माध्यमातून २.५ लाख ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबरशी जोडल जाणार आहे. याच्याशी जोडले जाऊन कमाई करु शकता.


करा फक्त एवढच


डिझायनिंग क्षेत्रातील तरुण या प्रकल्पाशी जोडले जाऊ शकतात. मोदी सरकार या प्रोजेक्टसाठी नवा लोगो तयार करत आहे. हा लोगो सामान्य माणसाच्या सहभागाने पूर्ण होणार आहे. जर तुम्ही तुमच कौशल्य यामध्ये दाखवू शकलात तर तुम्हीदेखील बक्षीसपात्र होऊ शकता.


मिळतील ५० हजार 


प्रोजेक्टसाठी येणाऱ्या लोगोंपैकी तुमच्या लोगोची निवड झाली तर तुम्हाला ५० हजाराचे बक्षीस मिळू शकते. यासोबतच उत्तेजनार्थ म्हणून १० हजार रुपयांच बक्षीस दिले जाणार आहे.


१५ मे पर्यंत मुदत 


जर तुम्ही यात सहभागी होऊ इच्छित असाल तर १५ मे पर्यंत लोगो जमा करावा लागणार आहे. लोगोवर काम करण्याआधी  या लिंकला नक्की भेट द्या. यावरील नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.