Crime News :  एका नवविवाहित महिलेची तिच्या दीराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमध्ये आरोपी दीराला त्याची आई म्हणजेच विवाहितेच्या सासूनेही साथ दिली. हत्या करून पोलिसांना दरोडेखोरांनी वहिनीचा खून करून ते पसार झाल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या खुनाचा तपास केला आहे. (Devar Bhabi Crime News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे प्रकरण? 
मृत सूनेचं दीड वर्षाआधी सिंगपूर गावातील दीपक सिंगसोबत लग्न झालं होतं. दीपक राजस्थानमध्ये नोकरी करत होता.  दीपक बाहेर गावी राहत असल्यामुळे सासूसोबत सूनेचं अनेकवेळा भांडणं होत होतीत. त्यासोबत दीपकचा भाऊही घरी असायचा त्याच्यासोबतही   दीपकच्या पत्नीचे खटके उडत होते. 


शनिवारी सायंकाळी काही कारणावरून सूनेमध्ये आणि सासूमध्ये वाद झाला.  त्याच रात्री घरात सासूने आणि दीराने गळा चिरून सूनेची निर्घृण हत्या केली. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दीराने या घटनेची माहिती पोलिसांना खोटी माहिती दिली. दरोडेखोरांनी घरावर डल्ला मारला आणि वहिनीची हत्या करून लुटमार करून पलायन केलं, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. 


असा झाला उलगडा- 
पोलिसांनी घरात पाहणी केल्यावर तिथली फरशी पाण्याने धुतली होती त्यामुळे पोलिसांना संशय आला. दरोडा पडल्याचं दीराने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र घरातील कपाट व्यवस्थित होतं, काही वस्तू जमिनीवर पडलेल्या होत्या. मृत सूनेच्या आईने दीपकच्या आईवर हुंड्यासाठी हत्या केली असा आरोप केला. 


पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दीराची आणि सासूची कसून चौकशी केली. जास्त वेळ ते सत्य लपवू शकले नाहीत. अखेर त्यांनी आपला गुन्हा मंजूर केला. पोलिसांनी सासू आणि दीराला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथली आहे.