बैतूल : मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. येथील एका ढाबा मालकाने नोकर जास्त खातो म्हणून त्याला नग्न करुन भीषण मारहाण केलीये. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडलीये. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शर्मा नावाच्या तरुणाने एक चपाती जास्त खाल्ली. यामुळे चिडलेल्या मालकाने त्याला नग्न करत रॉडने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालकाने नोकराला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचे समजतेय. पोलिसांनी ढाबा मालक आणि त्याचा साथीदार अशोकला अटक केलीये. तर पिडीत तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. 



याआधीही मालकाने केली होती मारहाण


एएसपी घनश्याम मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित मनीष शर्मा पंजाबच्या बख्तियारपूर येथे राहणारा आहे. बैतूल स्थित आमला परिसरातील गोल्डन ढाब्यावर कामाला होता. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ढाब्यावर जास्त जेवल्यास अथवा चहा प्यायल्यास अनेकदा मालकाने पीडित तरुणाला मारहाण केलीये. मंगळवारी पीडित तरुणाने एक चपाती जास्त खाल्ली म्हणून मालकाने आणि त्याच्या साथीदाराने मिळून त्याला खांबाला बांधले आणि लोखंडाच्या रॉडने त्याला मारहाण केली.