Gold Purchasing on Dhanteras 2024: आज 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवसांत सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. कारण सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दागिन्यांच्या रुपात तुम्ही सोनं खरेदी करु शकता. तसंच, सोनं हा असा मौल्यवान धातु आहे ज्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं सोन्यात गुंतवणुक करण्याची परंपरा दिवसेंदिवस वाढत आहे. लोकं सोन्याला वाईट काळातील मित्र समजतात. जर तुम्हालाही धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करायचं आहे तर त्याआधी समजून घ्या की सोन्यातील गुंतवणुक खरंच फायदेशीर आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्यामागे एक मान्यता आहे की, घरात सुख समृद्धी राहते. मात्र, खरं म्हणायचं झालं तर सोनं गुंतवणुकीसाठीचा सर्वात उत्तम पर्याय आहे. सोन्यात गुंतवणुक करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या पद्धतीने सोन्याच्या दरात वाढ होत आहे त्या हिशोबाने सोनं भविष्यात चांगला परताना देऊ शकतो. धनत्रयोदशी वा इतर सणांच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर भविष्यासाठी तुम्ही चांगली तरतूद करत आहात. 


कठिण काळात जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासते तेव्हा तुम्ही खरेदी केलेले सोनं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तुम्ही सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही सोनं विकून पैसे उभे करु शकता. सोनं हे असं धन आहे जे तुम्ही सहजरित्या कुठेही नेऊ शकता. 


तुम्ही सोन्यात अनेक पद्धतीने गुंतवणुक करु शकता. 


तुम्ही देखील धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर गरजेचे नाही की दागिन्यांचीच खरेदी केली पाहिजे. फिजिकल गोल्डव्यतिरिक्त डिजीटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ या पर्यायांचादेखील विचार करु शकता. डिजीटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफबद्दल जाणून घ्या. 


डिजीटल गोल्ड


फिजिकल गोल्डव्यतिरिक्त तुम्ही डिजीटल गोल्डदेखील खरेदी करु शकता. डिजीटल गोल्ड तुम्ही तुमच्या खिशातदेखील ठेवू शकता. वेळेनुसार त्याची किंमतदेखील वाढते. गरज पडल्यास तुम्ही सोनं ऑनलाइन विकु शकता. यात 1 रुपयांपासूनही तुम्ही गुंतवणुक करु शकता.


गोल्ड ईटीएफ


गोल्ड ईटीएफ शेअरप्रमाणेच खरेदी करुन तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये ठेवू शकता. हे एक म्युच्युअल फंडची स्कीम आहे. जे सोन्यात गुंतवणुक करण्याचा सोपा पर्याय आहे. या सोन्याला स्टॉक मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री करता येते. Gold ETFचे युनिटचा अर्थ 1 ग्रॅम सोनं. जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही एक किंवा दोन युनिट सोनं खरेदी करु शकता.