Bharat Jodo Yatra : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध झालेली ढिंचॅक पूजा (Dinchak pooja) तुम्हाला आठवतेय. गाण्याच्या अनोख्या शैलीमुळे ढिंचॅक पूजा रातोरता स्टार बनली होती. 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर' या गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ना सूर, ना ताल असणाऱ्या पूजाच्या गाण्यावर मोठी टीका झाली, अनेक मिम्स बनले, पण यानंतरही पूजाने आपली गाणी सुरुच ठेवली. 'सेल्फी साँग', 'दारू साँग आणि  'होगा ना कोरोना' ही तिच्या गाण्यांची प्रचंड चर्चा झाली.  रिअॅलिटि शो बिग बॉसमध्येही पूजा दिसली होती. पण गेल्या काही काळात सोशल मीडिया तिला विसरुन गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बऱ्याच वर्षांनंतर ढिचँक पूजा सोशल मीडियावर पुन्हा ट्रेंड होतेय. अनम अली (Anam Ali) नावाच्या एका मुलीच्या रॅप साँगने (Rap Song) लोकांना पुन्हा ढिंचॅक पूजा आठवतेय. अमन अलीपेक्षा ढिंचॅक पूजाची गाणी बरी होती, असं लोकं म्हणतायत. अमन अलीचं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय. 


भारत जोडो यात्रेसाठी रॅप साँग
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा 118 वा दिवस सुरु असून यात्रा सघ्या पंजाबमध्ये आहे. भारत जोडो यात्रेसाठी अमन अली नावाच्या मुलीने एक रॅप साँग गायलं आहे आणि सोशल मीडियावर ते वेगाने व्हायरल होतंय. हे गाणं ऐकून लोकं तिची तुलना ढिंचॅक पूजाशी करतायत. युजर्सने अनम अलीला चांगलंच ट्रोल केलंय. एका युजर्सने म्हटलंय ही ढिंचॅक पूजाची प्रतिस्पर्धी आहे. तर एका युचर्सने म्हटलं ढिंचॅक पूजा 2.0, एका युजरने म्हटलंय आज कळतंय ढिंचॅक पूजा किती महान होती.



ढिंचॅक पूजा झाली होती प्रसिद्ध
2017 मध्ये ढिंचॅक पूजाचं 'सेल्फी मैने ले ली आज' हे पहिलं गाणं गायलं आणि सोशल मीडियावर ते चांगलंच व्हायरल झालं. या गाण्यानंतर तिच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली. ही गाणं इतकं व्हायरल झालं की त्याला लाखांमध्ये व्ह्यूज मिळाले. पण या गाण्यामुळे ती प्रचंड ट्रोलही झाली.


ढिंचॅक पूजाचं खरं नाव पूजा जैन असं असून तिने स्वतःच ढिंचॅक या नावाची निवड केली. तिच्या गाण्यात ना अर्थ, ना सूर ना ताल असतो, तरीही सोशल मीडियावर तिच्या नावाची खूप चर्चा असते. त्यातून ती बक्कळ पैसा कमवते.  एका व्यक्तिने ढिंच्याक पूजा विरोधात रिपोर्ट केला होता त्यानंतर तिची सर्व गाणी युट्युब वरून ताबडतोब डिलिट करण्यात आली होती.