Shortest Railway Station Name In India: भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कसाठी ओळखली जाते. या नेटवर्कमध्ये तुम्हाला अशी अनेक स्टेशन्स पाहायला मिळतील जी त्यांच्या नावासाठी खास आहेत. भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणे खूप सोपे आणि स्वस्त देखील आहे. श्रीमंतांपासून गरीब वर्गापर्यंतचे लोक रेल्वेतून प्रवास करतात. स्वातंत्र्यानंतर रेल्वेचा विस्तार सातत्याने होत आहे. त्याचबरोबर प्रत्येक रेल्वे स्थानकाशी संबंधित काही इतिहास नक्कीच असतो. देशात अनेक रेल्वे स्थानके आहेत. स्थानकाच्या नावामागे आश्चर्यकारक अर्थ देखील आहे. काही नावं खूपच मजेदार आहेत. काही रेल्वे स्थानकाचे नावं खूप मोठी आहेत. तर स्थानकांची नावं छोटी आहे. देशातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचं नाव काय आहे, तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या नावावर फक्त दोनच अक्षरे आहेत. या स्थानकाचं नाव 'IB' आहे. ईब (IB) रेल्वे स्टेशन ओडिशामध्ये आहे. या स्थानकाचे नाव सुरू होताच संपते. भारतीय रेल्वे नेटवर्कमधील हे एकमेव स्थानक असून ज्याचे नाव इतके लहान आहे.



रेल्वे स्टेशनच्या नावात फक्त दोन अक्षरे आहेत. महानदीची उपनदी असलेल्या 'Ib' नदीवरून या लोकप्रिय स्थानकाचे नाव पडले आहे. ईब स्टेशनची इमारत खूपच लहान असून त्यात छोटे तिकीट काउंटर आणि प्रतीक्षालयही आहे. या स्थानकावरून फारच कमी गाड्या जातात आणि गाड्या देखील येथे फक्त 2 मिनिटे थांबतात. यामुळेच दोन-चार प्रवासी ईब स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असतात.