Appraisal vs Increment: सुरुवातीला करिअर, आपल्या आवडीचं क्षेत्र आणि मित्रमंडळी यांसाठी कमालीची जीवाभावाची वाटणारी नोकरी आणखी एका कारणामुळं या नोकरदार वर्गाठी महत्त्वाची ठरते. हे कारण असतं ते म्हणजे याच नोकरीच्या ठिकाणी मिळणारी पगारवाढ किंवा बढती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक कंपन्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांपासून वेध लागतात ते म्हणजे वार्षिक पगारवाढ आणि नोकरीतील पदामध्ये मिळणाऱ्या बढतीचे. वर्षभर केलेली मेहनत आणि त्या बळाावर वरिष्ठांनी याच योगदानाची दखल घेत दिलेला शेरा या साऱ्याचे थेट परिणाम Appraisal मध्ये दिसतात. पण, मुळात या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान Appraisal आणि Increment या दोन शब्दांचा सर्वाधिक वापर होत असला तरीही त्यांच्यामध्ये असणारा नेमका फरक तुम्हाला माहितीये? 


Appraisal अप्रायजल ही एक प्रक्रिया आहे जिथं तुमच्या कामाचं निरीक्षण केलं जातं. हे परीक्षण त्रैमासिक, सहा महिने किंवा एक वर्ष अशा कालावधीतील योगदानावर आधारित असतं. कंपनीनं तुम्हाला आखून दिलेलं लक्ष्य पूर्ण झालं आहे की नाही, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी कसं प्रदर्शन केलं, तुमची एकंदर वागणूक कशी होती या आधारे कर्मचाऱ्यांना प्रमोशन किंवा बोनस किंवा Increment दिली जाते. इंक्रिमेंट तुमच्या अप्रायजल प्रक्रियेचाच एक भाग असते. 


हेसुद्धा वाचा : Mahakumbh 2025 :  27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्... 


अप्रायजल ही एक प्रक्रिया असून, त्यामध्ये फीडबॅक, परफॉर्मन्स रिव्यू, प्रमोशन आणि सॅलरी इंक्रिमेंट या टप्प्यांचा समावेश असतो. सोप्या शब्दांत इंक्रिमेंट म्हणजे पगारवाढ. सरकारी नियम, कंपनी पॉलिसी आणि कर्मचाऱ्यांचं योगदान या आधारे पगारवाढ दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांसोबतच कंपनीच्या सरसकट विकास आणि प्रगतीचा आढावा घेत पगारवाढीचा आकडा ठरवला जातो. अनेकदा सरकारी निर्णय किंवा वेतन आयोगांमध्ये अप्रायजल प्रक्रियेशिवाच इंक्रिमेंट अर्थात पगारवाढ होते. त्यामुळं इथून पुढं हा फरक कायमच लक्षात ठेवा.