नवी दिल्ली : विमान प्रवास करताना आपल्याला विमानाच्या वेळाच्या थोडं आधी विमानतळावर पोहोचावे लागते. यामध्ये बॅक तपासणी सोबतच बोर्डींग पास तपासले जातात. यामध्ये प्रवाशांचा खूप वेळ जातो. पण कायदेशीर बाब असल्याने यामधून कोणाची सुटका नसते. आता यावर एक चांगला पर्याय विमान प्रशासनाने आणला आहे. त्यामुळे प्रवासाआधी बोर्डींग पास दाखवण्याचा तुमचा वेळ आता वाचणार आहे. बोर्डिंग पासच्या रांगेत उभं विमान प्रवाशांना उभे राहावे लागणार नाही. कारण आता प्रवाशाचा चेहरा हाच बोर्डिंग पास बनणार आहे. कारण राज्यातल्या पुणे विमानतळावर चेहरा स्कॅन करून प्रवाशाला विमानात बसण्यास परवानगी मिळणार आहे. यातून मिळालेला प्रतिसाद पाहता सर्व विमानतळांवर ही संकल्पना राबवली जाणार आहे. सध्यातरी देशांतर्ग प्रवासादरम्यान यंत्रणा कार्यान्वित असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डिजी यात्रा' अंतर्गत ही संकल्पना राबवली जात आहे. या संकल्पनेनुसार प्रवाशांना डिजी यात्राच्या पोर्टलवर स्वतःची माहिती अपलोड करावी लागणार आहे. या माहितीसोबत प्रवाशाचा स्कॅन केलेला फोटोही अपलोड होणार आहे.


विनाविलंब प्रवास 


विमानतळावर प्रवासी आल्यास त्याचा चेहरा स्कॅन केल्यास त्याच्या प्रवासाची माहिती विमानतळ प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला पुणे, विजयवाडा, वाराणसी आणि कोलकाता विमानतळावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना विनाविलंब विमानतळ परिसरात जाता येणार आहे. अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे प्रवाशांचा तापस करणाऱ्या सुरक्षाकर्मीची जबाबदारी संपेल. बोर्डिंग पासवर स्टॅम्प लावण्याचा त्यांचा वेळ वाचणार आहे. प्रवाशांना देखील सुलभता मिळेल तसेच तपास यंत्रणेत सुधार होईल. प्रवाशांना डिजीटल अनुभव देऊन त्रासमुक्त प्रवास व्हावा यासाठी सीएसएमआईएने हे पाऊल उचलले आहे. 


विमानतळाप्रमाणे रेल्वे प्रवाशांनाही आता सामान पास तपासणी प्रक्रीयेला सामोरे जावे लागू शकते. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून काही ठिकाणी याला सुरूवात देखील करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रवाशांना स्थानकात येण्याचे मार्ग ठराविक असणार आहेत. इतर मार्ग बंद केले जाणार आहेत. ठराविक प्रवेश द्वाराजवळ सुरक्षाकर्मी तैनात राहतील.  त्यामुळे रेल्वे प्रवाशांना देखील घरातून लवकर बाहेर पडावे लागणार आहे.