नवी दिल्ली :  वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह  हे नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी मोदी आणि त्यांचे समर्थकांना उद्देशून ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांना सोशल मीडियावर विरोधक 'भक्त' म्हणून संबोधतात. याच पार्श्वभुमीवर
दिग्विजय यांनी काही वेळापूर्वीच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मोदींचं छायाचित्र असून त्या बाजूला त्यांच्यावर टीका करणारा शिवराळ मजकूर आहे. 
मोदींची यशस्वी कामगिरी... 'भक्तांना *** बनवलं आणि *** लोकांना भक्त बनविलं', अशा आशयाचा तो मजकूर आहे. हा फोटो पोस्ट करताना दिग्विजय म्हणतात, 'हा मेमे माझा नाही. पण तो पोस्ट केल्याविना मला राहवत नाही. ज्याच्याबद्दल तो आहे त्याची माफी मागतो. पण मूर्ख बनविण्याच्या कलेत ते सर्वोत्तम आहेत.'


देशाच्या पंतप्रधानांचा अपमान  म्हणजे जनतेचा अपमान आहे, त्यामुळे स्वत: सोनिया गांधींनी  या प्रकारासाठी माफी मागितली पाहिजे असे भाजपा नेते नलिन कोहली यांनी 'झी न्यूज' ला सांगितले.