नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर आता सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या पाच महिन्यापासून सोन्याचे दर सतत वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांना टाळे लागले आहेत. पण आता नव्या पद्धतीच्या माध्यमातून  ग्राहकांना सोनं खरेदी करता येणार आहे. अत्यंत कमी किंमतीत सोमवारपासून सोनं खरेदी करता येणार आहे. यासाठी सरकारने काही नवीन उपाययोजना आणल्या आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ही' योजना सरकारने आणली आहे
सोनं खरेदी करण्यांचा लोकांचा कल लक्षात घेऊन मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) योजनेला सुरूवात केली होती. सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातून तुम्ही सोनं खरेदी करू शकता. 


यंदाच्या आर्थिक वर्षाचील या योजनेचा पुढील टप्पा ११ मे ते १५ मे दरम्यान आहे. २०१५ मध्ये प्रथम मोदी सरकारने या योजनेचा शुभारंभ केला होता. जर तुम्ही सरकारच्या  या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. झी बिझनेसच्या वृत्तानुसार सरकार लवकरच सोन्याचे दर देखील जाहीर करणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=49665 या संकेत स्थळाला भेट द्या.