धनत्रयोदशीच्या अगोदर सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण
25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी
मुंबई : दिवाळी हा सगळयांसाठी मोठा सण आहे. दिवाळीच्या सणात सोन्या-चांदीची खरेदी सारेचजण आनंदाने करतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करणं पसंत केलं जातं. 25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असून 27 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि 28 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा आहे. यानिमित्ताने सोन्याची खरेदी सर्वाधिक केली जाते.
सोमवारी सोन्याच्या दरात 30 रुपये कमी झाले असून दहा ग्रॅमकरता सोन्याचा दर 38,955 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सोने 38,985 रुपये दर होता.
महाराष्ट्रात सोन्याचा दर
मुंबई - 38,510 रुपये प्रति दहा ग्राम
पुणे - 38,510 रुपये प्रति दहा ग्राम
नाशिक - 38,510 रुपये प्रति दहा ग्राम
नागपूर - 38,510 रुपये प्रति दहा ग्राम
दिल्ली - सोने 22 कॅरेट प्रति दहा ग्राम 39,370 रुपये
दिल्ली - सोना 24 कॅरेट प्रति दहा ग्राम 39,200 रुपये
दिल्ली - चांदी 46,930रुपये
दिल्ली सराफ बाजारात सोन्यात 400 रुपये घसरण झाली असून आताचा दर 39,370 रुपये प्रति 10 ग्राम आहे. चांदीच्या दरात देखील घट झाली आहे. लंडन आणि न्यूयॉर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार, सोने 3.50 डॉलर कमी झाले असून 1,487.15 डॉलर प्रति ग्राम आहे. आंतरारष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात कपात झाली आहे.
तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरूवात होते. या निमित्ताने सोन्याची खरेदी केली जाते. यामुळे सराफ बाजारात मोठी तेजी असते. अनेकजण सोने खरेदी करत असतात. यामुळे सामान्यांच लक्ष सोन्याच्या दरांकडे असते.