नवी दिल्ली : दिवाळीपूर्वीच सोन्याच्या किंमती (Gold Rate) वेगाने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या (Diwali 2020) आठवड्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. MCX सोन्याचा डिसेंबरमधील दर ५२ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचे सहयोगी चॅनेल झी बिझनेसने सोन्याच्या किंमतींवर १० दलालांचा ब्रोकर पोल केलाय. या पोलमधून दिवाळीच्या आठवड्यात सोनं प्रति १० ग्रॅम ५३ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते हे स्पष्ट झालंय. 


या ब्रोकर पोलनुसार,  दिवाळीच्या आठवड्यात सोन्याची किंमत ५१ हजार ५०० ते ५२ हजार ५०० च्या दरम्यान असू शकते असे ४० टक्के दलालांचे मत आहे. तर ६० टक्के दलालांच्या म्हणण्यानुसार ५२ हजार २०० ते ५३ हजार रुपये प्रति ग्रॅमपर्यंत सोनं असेल.  



दिवाळी आठवड्यात सोन्याची किंमत काय असेल ?


ब्रोकरेज हाऊस - किंमत (रुपये / १० ग्रॅम)


केडिया कमोडिटी ५३, ०००
कोटक सिक्युरिटीज ५२, ५०० 
अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज ५२, ५००
रिलिगेअर ब्रोकिंग ५२, २००
मोतीलाल ओसवाल ५२, २५०
चॉइस ब्रोकिंग ५२, २००
आनंद राठी ५२, ००
निर्मल बँग ५२, ०००
एसएमसी कॉमरेड ५१, ८००
पृथ्वी फिनमार्ट ५१, ५००


सोन्याचे दर काय असतील ? 


'अमेरिकेची निवडणूक संपली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होणार नाही. दिवाळीच्या ३-४ दिवस आधी किंमत निश्चितपणे ५२, २०० ते ५३,००० पर्यंत जाऊ शकते असे आयबीजेएचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले.


मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून सोन्याच्या किंमतींमध्ये आतापर्यंत ४३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पण आता असा कोणताही इव्हेंट नाही. आपण कोरोना लसीच्या जवळ आहोत. अमेरिकेची निवडणूक संपली आहे आणि चित्र स्पष्ट झालंय. सर्व देशांत औद्योगिक उत्पादन हळूहळू वाढत असल्याचेही ते म्हणाले.


'अत्यल्प परतावा मिळण्याची अपेक्षा नाही. जास्तीत जास्त वार्षिक परताव्याची १० टक्के अपेक्षा ठेवायला हवी असे सुरेंद्र मेहता यांनी सांगितले.